व्हॉट्सअ‍ॅपचा हा नवा अपडेट देणार अ‍ॅडमिनला अधिक पॉवर

कुटुंबियांपासून ते ऑफिस कलिगपर्यंत अनेकांचे आणि अनेक प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतात. तुम्ही जर अशापैकी कोणत्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल तर ही माहिती तुम्ही नक्की जाणून घ्यायलाच हवी.  

Updated: Jan 13, 2018, 12:14 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपचा हा नवा अपडेट देणार अ‍ॅडमिनला अधिक पॉवर

मुंबई : कुटुंबियांपासून ते ऑफिस कलिगपर्यंत अनेकांचे आणि अनेक प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतात. तुम्ही जर अशापैकी कोणत्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल तर ही माहिती तुम्ही नक्की जाणून घ्यायलाच हवी.  

'इंस्टाग्राम स्टोरीज', 'व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स' असे अनेक फीचर्स गेल्या काही दिवसांमध्ये अपडेट करण्यात आले आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या बटणसाठी टेस्टिंग करत आहेत. 

काय असेल नवे अपडेट ? 

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता एक अ‍ॅडमिन दुसर्‍या अ‍ॅडमिनला 'डिमोट' किंवा 'डिस्मिस' करू शकणार आहे. म्हणजे दुसरा अ‍ॅडमिन ग्रुपचा सदस्य राहील मात्र त्याच्याकडे ग्रुपची पॉवर नसेल. 

आयओएस  अ‍ॅपवर टेस्टिंग  

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटनुसार एखाद्या अ‍ॅडमिन सदस्याला ग्रुपमधून बाहेर न काढता त्याच्याकडील पॉवर कमी करण्याची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे संबंधित सदस्याला पुन्हा ग्रुपमध्ये घेता येते. 

व्हॉट्स अ‍ॅपचे हे फीचर अ‍ॅन्ड्रॉईड बीटा वी 2.18.12 आणि आईओएस अ‍ॅपवर टेस्ट करण्यात येणार आहे. 

ग्रुपमधून न काढता करू शकाल डिस्मिस 

'नव्या अपडेटनुसार, ग्रुपमध्ये 'ग्रुप इन्फो' सेक्शनमध्ये तुम्हांला डिस्मिस करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायानुसार, कोणालाही डिस्मिस न करता त्याच्याकडील पॉवर कमी केली जाऊ शकते.  'Dismiss As Admin' हा ऑप्शन ग्रुप इंफोमध्ये देण्यात आली आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close