व्हॉटसअॅप यूझर्ससाठी खुशखबर

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने फाईल ट्रान्सफरसाठी नवे अपडेट आणले होते. या अपडेटमुळे यूझर्स कोणत्याही फॉरमॅटमधील फाईल ट्रान्सफर करु शकता. आता अशी बातमी आलीये की व्हॉट्सअॅपवर यूट्यूब व्हिडीओजही पाहता येणार आहेत. 

Updated: Jul 17, 2017, 03:56 PM IST
व्हॉटसअॅप यूझर्ससाठी खुशखबर

मुंबई : काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने फाईल ट्रान्सफरसाठी नवे अपडेट आणले होते. या अपडेटमुळे यूझर्स कोणत्याही फॉरमॅटमधील फाईल ट्रान्सफर करु शकता. आता अशी बातमी आलीये की व्हॉट्सअॅपवर यूट्यूब व्हिडीओजही पाहता येणार आहेत. 

सध्या व्हॉटसअॅपवर पाठवलेले यूट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागते. त्यानंतर यूट्यूब चॅनेलवर आपण व्हिडीओ पाहू शकतो. 

मात्र या नव्या फीचरमुळे तुम्ही चॅटबॉक्समध्ये यूट्यूब व्हिडीओ प्ले करु शकता. WABetaInfioच्या रिपोर्टनुसार या व्हिडीओला लहान अथवा मोठे करता येईल. चॅटदरम्यान तुम्ही व्हिडीओही पाहू शकता. दरम्यान, अद्याप या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाहीये.