स्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे Xiaomi चा स्मार्ट TV

काही दिवसांपूर्वी मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने स्मार्ट TV लाँच केला आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 13, 2018, 03:26 PM IST
स्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे Xiaomi चा स्मार्ट TV

मुंबई : काही दिवसांपूर्वी मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने स्मार्ट TV लाँच केला आहे. 

कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या दोन्ही टीव्हीचा सेल हा 13 मार्चपासून मंगळवारी सुरू होणार आहे. 

शाओमीने एमआयटीव्ही 4A स्मार्ट TV ला 32 इंच आणि 43 इंचमध्ये असे दोन वेरिएंट लाँच केले आहेत. 32 इंच असलेला टीव्ही 13,999 रुपये आणि 43 इंच टीव्ही 22,999 रुपयांत मिळणार आहे. या दोन्ही मॉडेलला कंपनीने भारतीय बाजारात आणलं आहे. या अगोदर कंपनीने 55 इंचाचा एमआय टीव्ही 4 लाँच केला आहे. 

32 इंच आणि 43 इंचाचा एमआय टीव्ही 4A मध्ये AI बेस्ड पॅचवॉल UI दिला आहे. Mi.com च्या संकेत स्थळावर 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 24,999 रुपये आणि 32 इंचाची टीव्हीची किंमत 14,999 रुपये आहे. 

या दोन्ही टीव्हीमध्ये 5 लाख कंटेट देण्यात आला आहे. ज्यामध्ये 80 टक्के फ्री कंटेट आहे. हॉट स्टार, वूट, वूट किड्स, सोनी लिव, हंगामा प्ले, जी5, सन नेक्सट, एएलटी बालाजी, व्यू, टीवीएफ आणि फ्लिक्स ट्री कंपनीचे कंटेंट पार्टनर आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close