परदेशातील भारतीयांमुळे रुपयाची घसरण- प्रकाश आंबेडकर

...तर भारताचा अत्यल्प परकीय चलनाचा साठा संपेल.

Updated: Sep 8, 2018, 07:31 PM IST
परदेशातील भारतीयांमुळे रुपयाची घसरण- प्रकाश आंबेडकर title=

नागपूर: सध्या देशभरातील अर्थतज्ज्ञांकडून रुपयाच्या घसरणीविषयी चिंता व्यक्त केली जात असताना भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळा तर्क मांडला आहे. 

मोदी सरकारची उद्योगविरोधी भूमिका आणि ईडी, इन्कम टॅक्स विभागाच्या आकसपूर्व कारवाईच्या भीतीपोटी गेल्या तीन वर्षात देशातील ७५ हजार उद्योगपती कुटुंब परदेशात जाऊन स्थायिक झाली आहेत. ते रुपयाच्या बदल्यात डॉलर्स घेत असल्यामुळे रुपयाची इतक्या वेगाने घसरण सुरु आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. 

ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर भारताकडील अत्यल्प परकीय चलनाचा साठा संपेल, अशी भीतीही आंबेडकर यांनी व्यक्त केली.