चंद्रपुरात वाघिणीचा सापडला मृतदेह... मृत्यूचे कारण हे...

चंद्रपुरात वाघिणीचा सापडला मृतदेह... मृत्यूचे कारण हे...

जिल्ह्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर जंगलातल्या नाल्यात मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीचा मृत्यू अति तापमानामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. 

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय

गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ % तर गेल्या ५ महिन्यात हीच वाढ तब्बल ५,१३१ आहे. महत्वाचे म्हणजे संघाच्या या वाढीत तरुण पिढीचं मोठं योगदान आहे. 

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन कंत्राटदारांना अटक

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणाऱ्या तीन तेंदूपत्ता कंत्राटदारांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 लाखांच्या रकमेसह पत्रकंही जप्त करण्यात आली आहेत. आलापल्ली इथे पोलिसांनी ही कारवाई केली.

नागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत

नागपुरात ई टॅक्सी सेवा, इंधनाची बचत

राज्याची उपराजधानी नागपुरात ई टॅक्सीची सुरूवात होतेय. संपूर्ण देशातला हा पहिलाच प्रकल्प आहे.

शेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा

शेतकरी १ जूनपासून संपावर, किसान क्रांती संघटनेची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

नागपूरमध्ये भरदिवसा वायूसेनेच्या अधिकाऱ्याचे १६ लाख लुबाडले

नागपूरमध्ये भरदिवसा वायूसेनेच्या अधिकाऱ्याचे १६ लाख लुबाडले

नागपूरच्या वाडी भागात भर दिवसा निवृत्त वायूसेना अधिकारी जगमलसिंग यादव यांच्यावर हल्ला करून त्याचे १६ लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना घडलीये. 

दीड महिन्यात ४३  नवजात बालकं दगावली

दीड महिन्यात ४३ नवजात बालकं दगावली

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील  बाई गंगाबाई स्त्री शासकीय रुग्णालयात १५ दिवसांत १८  नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरण, मुलीच्या हत्येचा प्रयत्न

आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरण, मुलीच्या हत्येचा प्रयत्न

आंतरजातीय प्रेम विवाह प्रकरणाच्या वादातून मुलीला विष पाजून संपवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील निभारी गावात घडली. 

गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार

गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार

जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेयत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला.

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय. 

२० लीटर शुद्ध पाण्यासाठी द्या फक्त ५ रूपये

२० लीटर शुद्ध पाण्यासाठी द्या फक्त ५ रूपये

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रत्येक गावात जाणवते. पाण्याची पातळी खालावल्यानं पाण्याचे स्त्रोतही प्रदूषित होतात.

 पोलीस अधीक्षक वनिता साहूंची आयडीयाची कल्पना

पोलीस अधीक्षक वनिता साहूंची आयडीयाची कल्पना

भंडारा जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये सध्या अचानक पोलीस येऊन धडकतात..... मग ग्रामस्थांची थोडी घाबरगुंडी उडते.... पण हे पोलीस ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचलेले असतात.... भंडा-यातल्या पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी एक भन्नाट आयडिया काढलीय..... पाहुया काय आहे त्यांची ही आयडिया..... 

राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय

राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय

येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.

नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

नागपुरात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची आज नोंद झालीय. नागपूरचा पारा ४६.२ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचलाय. 

जलयुक्त शिवारात घोटाळ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...

जलयुक्त शिवारात घोटाळ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यात जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याची जिल्हानिहाय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात

 विदर्भातल्या शिवसंपर्क अभिय़ानाच्या निमित्तानं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरात आल्यावर उद्धव ठाकरेंनी अकोला जिल्ह्यातल्या शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. याशिवाय पक्षाच्या अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातले पदाधिका-यांशी उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडतील.

नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

नागपुरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

नागपूरच्या कन्हान गावात आज दुपारी जवेलर्सच्या दुकानवार दरोडा टाकून गोळीबार करण्यात आला... दरोड्याला विरोध करणाऱ्या दुकान मालकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने दुकान मालक जखमी झाला... 

नरभक्षक अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार

नरभक्षक अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार

चंद्रपूर जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात तीन ठार तर तीन जखमी झालेत.

धुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका

धुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका

धुळे शहरात काल सांकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे.

दानवेंची जिभ हासडणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस जाहीर

दानवेंची जिभ हासडणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस जाहीर

यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून, शेतकऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे.

भूमाफियांना दणका, 150 अवैध झोपड्या जमीनदोस्त

भूमाफियांना दणका, 150 अवैध झोपड्या जमीनदोस्त

अनेकांच्या जमिनी बळकावलेला भूमाफिया ग्वालबंशीच्या मुसक्या आवळण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवैध बांधकाम पाडण्यात येत आहेत.