आयसीसीचा पाकिस्तान दौरा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ जोफ एलार्डिस यांनी नुकताच पाकिस्तान दौरा केला.

पीसीबी अध्यक्षांची घेतली भेट

भारतात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघ सहभागी होईल याचं आश्वासन घेण्यासाठी पीसीबी अध्यक्षांची भेट घेतली

पाकिस्तान भारतात खेळणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी बार्कले यांना पाकिस्तान संघ भारतात खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं.

पाकने ठेवली अट

पण त्याचबरोबर नजम सेठी यांनी आयसीसीसमोर एक अटही ठेवली. पाकिस्तान क्रिकेट संघ आपला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळणार नाही

पाकला सुरक्षेची काळजी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अहमदाबादमध्ये आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी वाटतेय. त्यामुळे मोदी स्टेडिअम खेळण्यास पीसीबीने नकार दिला आहे.

अहमदाबादमध्ये खेळणार नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आपले सामने चेन्नई, कोलकाता किंवा बंगळुरुमध्ये खेळण्यास तयार आहे.

फायनलमध्ये पोहोचल्यास काय?

पण बाद फेरीचे सामने किंवा अंतिम सामन्यापर्यंत पाकिस्तान पोहोचल्यास अहमदाबाद सामना खेळण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

वर्ष अखेरीस स्पर्धा

2023 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात खेळली जाणार आहे

दहा संघांचा समावेश

वर्ल्ड कपमध्ये तीन नॉकआऊट सामन्यांसह एकूण 48 सामने खेळले जातील. एकूण दहा संघांचा समावेश असणार आहे.

12 स्टेडिअममध्ये सामने

मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, धर्मशाला, इंदूर आणि राजकोट या ठिकाणी वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील.

VIEW ALL

Read Next Story