लग्नानंतरही 'या' अभिनेत्रींना

नाही मिळालं मातृत्वाचं सुख

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही कायम चर्चेत असतात. जोडीदार आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात मात्र आजही या अभिनेत्रींना मातृत्त्वाचं सुख मिळालं नाही.

सायरा बानू

या यादीतील पहिलं नाव आहे सायरा बानो. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीने दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं. आयुष्यात प्रत्येक सुख त्यांना मिळालं. पण हे जोडपं आई-वडिलांच्या आनंदापासून वंचित राहिलं.

शबाना आझमी

या यादीत पुढचं नाव आहे बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीचं. शबाना आझमी यांनी प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं. जावेद यांना पहिल्या पत्नी हनी इराणीपासून फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन मुलं आहेत.

जयाप्रदा

बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक जयाप्रदा लग्नाला इतकी वर्षे उलटूनही मुलाचं सुख मिळालं नाही. बरेच दिवस मूल न झाल्यामुळे या जोडप्याने एक मूल दत्तक घेतलंय. श्रीकांत नाहटा यांनी जयाप्रदासोबत दुसरं लग्न केलंय.

रेखा

रेखा आजही करोडो हृदयांची धडधड वाढवणारी रेखा आज 68 वर्षांची आहे. तीन लग्न करुनही तिच्या नशिबात पती आणि मुलाचं सुख नाही.

संगीता बिजलानी

संगीता बिजलानीचा विवाह भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसोबत झाला होता. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. मात्र लग्नाला बराच काळ लोटल्यानंतरही संगीताला आईचं सुख मिळालं नाही. मोहम्मद अझरुद्दीनला पहिला पत्नीपासून दोन मुलं आहेत.

VIEW ALL

Read Next Story