ऐश्वर्या रायमुळे जया बच्चनने शाहरुख खानला मारली कानशिलात

शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यादोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे. शाहरुख खानचं बच्चन कुटुंबासोबत खास नातं आहे हे सगळ्यांना माहिती आहे.

पण एकदा ऐश्वर्या रायमुळे जया बच्चन शाहरुख खानवर नाराज झाल्या होत्या. एवढंच नाही तर त्यांनी शाहरुख खानच्या कानशिलात लगावली होती.

शाहरुख आणि ऐश्वर्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने तमाशा केला होता. या तमाशानंतर ऐश्वर्याला चित्रपट सोडावा लागला होता. त्यावेळी किंग खान व सलमानमध्ये बाचाबाची झाली होती.

शाहरुख-सलमान भांडण आणि शाहरुखने ऐश्वर्यावर केलेल्या कमेंट ही जया बच्चन यांना समजली होती.

पीपल्स मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी सांगितलं की, तो जे ऐश्वर्याबद्दल बोलला मला आवडलं नाही. मला त्याच्याशी या विषयावर बोलण्याची संधी मिळाली नाही.

पण जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा मी त्याला कानाखाली मारेल. जसं मी माझ्या मुलाला मारते. शाहरुखसोबत माझं घट्ट नातं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story