दबंग गर्ल

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजेच सोनाक्षी सिन्हा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे.

सलमान खानसोबत पहिला सिनेमा

सोनाक्षी सिन्हाने तिचा पहिला चित्रपट सलमान खानसोबत केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला.

पहिली नोकरी

एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षी सिन्हाने खुलासा केला होता की, तिला कॉलेजमध्ये असताना पहिली नोकरी करण्याची संधी मिळाली होती.

फॅशन डिझायनिंग कोर्स

यावेळी ती कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. सोनाक्षी म्हणते- माझ्या पहिल्या कामात मी स्वयंसेवक म्हणून काम केले.

केवळ 3000 रुपये पगार

5 दिवसांच्या फॅशन शोसाठी तिला 3000 रुपये पगार देण्यात आला होता. या काळात लोकांना त्यांच्या जागेवर बसवणे हे तिचं काम होतं असं ती म्हणते.

स्वयंसेवक म्हणून काम केले

विशेष म्हणजे त्या शोमध्ये सलमान खान आणि अरबाज खानही आले होते. सलमानने तिला पाहता विचारले की तू इथे काय करत आहेस?

लोकांची आसनव्यवस्था करणे

त्यावर सोनाक्षीने सांगितले की मी इथं काम करत आहे आणि माझं काम लोकांना त्यांच्या जागेवर बसवणे आहे.

पहिला पगार फक्त तीन हजार रुपये होता

यानंतर सलमानने विचारले की तुला यासाठी किती पैसे मिळत आहेत. यासाठी मला तीन हजार रुपये मिळत असल्याचे सोनाक्षीने त्यांना सांगितलं.

सलमान खानला हसु अनावर

सोनाक्षी सिन्हाचा पगार ऐकून सलमान खान यावर सलमान खानला हसणं आवरलं नाही.

मुलाखती दरम्यान खुलासा

सोनाक्षीच्या या पगारातून सलमानने त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट मागितले. असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला. (All Photo Credit: Social Media)

VIEW ALL

Read Next Story