एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वकील गुणरत्न सदावर्तें यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्यांचे कौतुक केले आहे.

"माझी आजी इतकी सुंदर होती की तिच्यापुढे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना म्हणजे काहीच नाही. रश्मिका माझ्या आजीपुढे पाणी कम चाय असे म्हणावे लागेल. एव," असे सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

माझी आजी एवढी सुंदर होती.अगदी रशियन मुलींप्रमाणे माझ्या आजीची उंची सहा फूट होती आणि आजी खूपच स्लिम होती. तिचा फेस व्ही कट होता. ती दारु तयार देखील करायची आणि ती स्वत: टेस्ट ती देखील करायची, असे सदावर्ते म्हणाले.

ती मला आडव्होकेट म्हणायची. तिला अ‍ॅडव्होकेट म्हणता यायचे नाही. तिला वाटायचे मी वकीलच झालो पाहिजे. कारण तिने तिची सगळी लेकरे तुरुंगात पाहिली. वकिलांना मान द्यावा लागतो असं तिला वाटायचं, अशीही आठवण सदावर्तेंनी सांगितली.

बिग बॉस हिंदीसाठी माझ्याकडे लोकं दोन महिने फेऱ्या घालत होते. अॅग्रीमेंट घेऊन त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर दोन महिने फेऱ्या घालत होता, असाही खुलासा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

जेनला खतरों के खिलाडी हिंदीसाठी विचारण्यात आले होते. त्या लोकांनी सहा महिने वाट पाहिली. आमचं जीवन हे खूप व्यस्थ आहे. फिल्मी जीवनासाठी आमचा जन्म झालेला नाही. गरजवंतांना मदत करण्यासाठी आमचा जन्म झाला आहे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

"मी पत्रकारीतेचा शिक्षक होतो, पण मी ड्रामा डीपार्टमेंटला नव्हतो. त्यामुळे पत्रकारांना काय लागतं टीव्हीवर हे चांगलच मला ठाऊक आहे," असेही सदावर्ते यांनी त्यांच्या अनोख्या शैलीबाबत बोलताना सांगितलं आहे.

VIEW ALL

Read Next Story