येत्या 7 सप्टेंबरला किंग खानचा जवान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनेक ट्विस्ट असल्याचं बोलं जातं आहे.

चित्रपट म्हटला की नायक आणि खलनायक आलाच. अशात जवानमध्ये शाहरुख की विजय सेतुपती या दोघींपैकी कोण खलनायक आहे, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

रेड चिलीजने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये खलनायक कोण आहे हे खुद्द अभिनेत्याने सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये विजय सेतुपतिला विचारण्यात आलं की, चित्रपटात खलनायक कोण आहे? त्यावर अभिनेता म्हणाला की, मी जेव्हा कधी खलनायकाची भूमिका निभावतो, तेव्हा मी विलेन नसतो तर नायक विलेन असतो.

तो पुढे म्हणाला की, कारण जेव्हा मी माझं काम करतो तेव्हा जर माझ्या कामात कोणी अडथळा आणला तर तो माझ्यासाठी विलेन असतो. म्हणून शाहरुख विलेन आहे.

जेव्हा शाहरुख खानला खलनायक कोण आहे असं विचारलं तेव्हा तो म्हणाला की, मी चांगला आहे की वाईट, मी पुण्य करतो की पाप...हे तुम्ही स्वत:ला विचारा कारण मी तुम्ही आहे. कारण तो एक सामान्य माणूस आहे जो अनकॉमन काम करतो. जो प्रत्येकांच्या हितासाठी अबनॉर्मल काम करतो.

जवानमध्ये शाहरुख खान 5 वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येतं आहे.

VIEW ALL

Read Next Story