पंकज त्रिपाठीने दिली माहिती

मिर्झापूरचा कालिन भैया म्हणजेच अभिनेता पंकज त्रिपाठी याने या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनबद्दल महत्त्वाती माहिती दिली आहे.

कधी येणार मिर्झापूर सीझन 3?

मिर्झापूर सीझन 3 या वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. त्याचे डबिंग अजून बाकी आहे, असे अभिनेता पंकज त्रिपाठीने सांगितले.

वर्षाच्या अखेरीस येण्याची शक्यता

पंकज त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीवरून मिर्झापूरचा नवा हंगाम यायला अजून वेळ आहे, असा अंदाज बांधता येतो. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस तो येऊ शकते.

काय असेल मिर्झापूर सीझन 3?

सीझन 3 मध्ये कालिन भैया आणि गुड्डू यांच्यातील 'युद्ध' सुरूच राहणार असल्याचे माध्यमांच्या वृत्तामध्ये आधीच सांगण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सीझन 3 मध्ये कोणाचा वरचष्मा?

मिर्झापूर सीझन 2 मध्ये कालिन भैय्यावर गुड्डू चांगलाच भारी पडला होता. कालिन भैयाला त्यांच्या पत्नीचाही पाठिंबा मिळाला नाही. आता सीझन 3 मध्ये कोणाचा वरचष्मा होतो हे पाहावे लागेल.

अजूनही वाटच पाहावी लागणार

गेल्या वर्षी जूनमध्ये मिर्झापूरच्या सीझन 3 बद्दल बातमी आली होती की शूटिंग सुरू होणार आहे. मात्र, इतक्या महिन्यांनंतरही चाहते नव्या सीझनच्या टीझरची वाट पाहत आहेत.

काय आहे मिर्झापूर?

ही मालिका दोन कुटुंबांच्या कथेवर आधारीत आहे. एकीकडे अखंडानंद 'कालिन' त्रिपाठीचे राज्य, तर दुसरीकडे रमाकांत पंडित नावाच्या प्रामाणिक वकिलाचे कुटुंब यांच्यातील वाद दाखवण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story