करीना कपूर खान

करीनानं तिचे आजोबा राज कपूर यांच्या निधनानंतर होळी हा सण साजरा करणं सोडलं आहे. तर एका मुलाखतीत करीनानं खुलासा केला होता की त्यानं तिचे केस खराब होतील असे तिला वाटतं.

रणबीर कपूर

रणबीरचं बलम पिच्कारी ह्या होळीच्या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं असलं तरी देखील रणबीरला होळी आणि रंगांशी खेळायला आवडत नाही.

करण जोहर

2012 साली करण जोहरनं खुलासा केला होता की तो जेव्हा 10 वर्षांचा होता तेव्हा त्याच्यावर कोणी सडलेलं अंड फेकलं होतं आणि तेव्हा पासून त्यानं होळी खेळणं बंद केलं.

जॉन अब्राहम

2016 साली जॉननं खुलासा केला होता की तो होळी खेळत नाही. त्याच्या मते पुरुष होळी या सणाचा चूकिच्या पद्धतीनं फायदा घेतात. होळीमध्ये पाणी वेस्ट होते आणि निसर्गावर याचा वाईट परिणाम होतो.

शृती हासन

शृतीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिची त्वचा ही सेन्सेटिव्ह आहे. त्यामुळे तिच्यावर जर रंग लागला तर तो निघत नाही आणि तिला अॅलर्जी होते.

अर्जुन कपूर

अर्जुन कपूरनं वयाच्या 17 ते 18 पर्यंत होळी खेळली. त्यानंतर त्याला रंगांची अॅलर्जी झाली आणि त्यानं होळी खेळणं बंद केलं.

रणवीर सिंग

रणवीरनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्याला स्वच्छतेबाबात OCD आहे. ज्यामुळे त्याला त्याच्या अंगावर रंग फेकलेले आवडत नाही.

VIEW ALL

Read Next Story