सैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला

सैफ अली खानने अमृता सिंगशी अत्यंत गुप्तपणे लग्न केलं होतं. सैफ तेव्हा फक्त 21 वर्षांचा होता.

विशेष म्हणजे त्याने आई-वडिलांनाही लग्न करत असल्याचं सांगितलं नव्हतं. त्यामुळे शर्मिला टागोर दुखावल्या होत्या.

शर्मिला टागोर यांनी कॉफी विथ करणमध्ये हा खुलासा केला.

'मी काही कामानिमित्त मुंबईत आली असता सैफ भेटायला आला. त्यावेळी त्याने मला लग्न केल्याचं सांगितलं,' असं शर्मिला यांनी सांगितलं.

सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं.

सैफ गेल्यानंतर शर्मिला यांनी टायगर यांना सांगितलं. तेदेखील काही वेळासाठी शांत झाले होते. यानंतर शर्मिला यांनी मला त्या मुलीला भेटायचं आहे असं सांगितलं.

शर्मिला यांच्यानंतर सैफने आपली बाजू मांडताना सांगितलं की, आईने मला एकत्र राहा पण लग्न करु नको असा सल्ला दिला होता.

त्यावर मी म्हटलं होतं, मी कालच लग्न केलं. हे ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला फार दुखावलं आहेस असं ती म्हणाली.

सैफ आणि अमृता 1991 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुलंही आहेत. 13 वर्षाच्या संसारानंतर दोघे विभक्त झाले.

VIEW ALL

Read Next Story