झोपडपट्टी ते स्टार

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीतल्या एका 14 वर्षांच्या मुलीची सध्य सोशल मीडियावर चर्चा आहे.

स्लम प्रिंसेस ऑफ इंडिया

या मुलीचं नाव आहे मलीशा खारवा. सोशल मीडियावर मलीशा 'स्लम प्रिंसेस ऑफ इंडिया' या नावाने ओळखली जातेय

द युवती कलेक्शनसाठी निवड

प्रसिद्ध ब्यूटी प्रोडक्ट Forest Essentials या कंपनीने मलीशाची 'द युवती' कलेक्शनसाठी मलीशाची निवड केली आहे.

हॉलिवूड अभिनेत्याची नजर

मलीशाला 2020 मध्ये हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमेनने सर्वात आधी पाहिलं. एका शुटिंगच्या निमित्ताने ते मुंबईत आले होते.

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स

मलिशा मॉडलिंगबरोबर कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सव्वादोन लाख फॉलोअर्स आहेत.

मलीशावर शॉर्ट फिल्म

मलीशाने काही मॉडलिंग शोमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय मलीशावर Live Your Fairytale ही शॉर्टफिल्मही बनली आहे.

मलीशाच्या चेहऱ्यावरचे भाव

फॉरेस्ट एसेंशियल्सने मलीशा खारवाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात मलीशा एका स्टोरला भेट देताना दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल

फॉरेस्ट एसेंशियल्सचं हे स्टोर असून यात मलीशाचे फोटो प्रोडक्टवर दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडिया स्टार

धारावी झोपडपट्टीत राहाणाऱ्या मलिशाला तिच्या परिसरातही फारसं कोणी ओळखत नव्हतं. पण आज लाखो लोकं तिच्याबद्दल चर्चा करतायत. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

सर्वात मोठं यश

फॉरेस्ट एसेंशियल्सचं ब्रँड अँम्बेसेडर होणं हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं यश असल्याचं मलीशा म्हणते. मलीशा मॉडलिंगबरोबर आपल्या अभ्यासावरही लक्ष देते

VIEW ALL

Read Next Story