Parineeti नाही तर

'या' 4 अभिनेत्रींनी केलं राजकारण्यांशी लग्न

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे लग्न करणार आहे. उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये त्यांचं लग्न होणार आहे.

परिणीतीशिवाय 4 अभिनेत्रीनी राजकारण्यांशी लग्न केलं आहे. त्या कोण आहेत पाहूयात...

बॉलिवूडची धकाकेबाज अभिनेत्री स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसोबत लग्न केलं आहे. ती लवकरच आई होणार आहे.

टारझन द वंडर कार आणि वाँटेड या चित्रपटातील अभिनेत्री आयशा टाकियाने समाजवादी पक्षाचे नेते फरहान आझमीसोबत लग्न केलं. ती लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

बॉलिवूड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी नेते रवी राणासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकलं असून त्या अमरावतीच्या खासदार आहेत.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी राधिका कुमार स्वामी यादेखील दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री होत्या. मात्र लग्नाच्या चार वर्षांनी ते वेगळे झाले.

VIEW ALL

Read Next Story