मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आपले अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर करत असते.

वडिल सचिन, आई अंजली आणि भाऊ अर्जुन तेंडुलकरबरोबर तीने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या गणपतीला हजेरी लावली होती. यावेळचे फोटो तीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गणेश चतुर्थीनिमित्ताने सारा तेंडुलकरने भारतीय पारंपारिक पोषाख परिधान केला होता. चमकदार पिवळ्या रंगाच्या या पोषाखात सारा खुपच सुंदर दिसत होती.

पारंपारिक पोषाखाबरोबरच साराने डोळ्यात काजळ घातलं होतं. तर केसात तीने गजरा माळला होता.

सारा तेंडुलकरच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. साराच्या या फोटोंना अवघ्या दोन तासात 5 लाख युजर्सने लाईक केलं आहे.

गणेशोत्सवानिमित्ताने साराने श्री गणेशाची पूजा केली. याची स्टोरी तीने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच पॉप्युलर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story