दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून समांथा रुथ प्रभूला ओळखले जाते.

समांथाने तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

आता समांथाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

यात समांथाने काळ्या रंगाचा पँटसूट परिधान करत शर्टलेस फोटोशूट केले आहे.

या फोटोला कॅप्शन देताना तिने 'ही आजच्या काळातील फॅशन आहे' असे म्हटले आहे.

समांथाच्या या नव्या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड आणि मनमोहक अंदाज दिसत आहे.

समांथाच्या या शर्टलेस लूकवर अनेक कलाकार आणि तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहे. त्यावर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

दरम्यान समांथा लवकरच 'सिटाडेल', 'हनी बनी' या चित्रपटात झळकणार आहे. यात ती वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story