श्वेता बच्चनने शेअर केला फॅमिली फोटो

11 ऑक्टोबरला बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी आपला 81 वा वाढदिवस शेअर केला. अमिताभ बच्चन यांच्यासाठी 'जलसा' बंगल्यात खास पूजेचं आयोजन कऱण्यात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस

अर्ध्या रात्री अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासह वाढदिवस साजरा केला. नव्याने आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो इंस्टाग्रामला शेअर केला होता.

फॅमिली फोटो

या फोटो नव्यासह अमिताभ बच्चन यांच्यासह आराध्या, जया बच्चन आणि अगस्त्य नंदा होते. या फोटोत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नव्हते.

ऐश्वर्या रायने क्रॉप केला फोटो

ऐश्वर्या रायने 12 ऑक्टोबरला इंस्टाग्रामला वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला. पण तिने फोटो क्रॉप केला होता.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

फोटोत फक्त आराध्या आणि अमिताभ दिसत होते. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि चर्चेला तोंड फुटलं. सासू जया बच्चनलाही क्रॉप केल्याने नेटकरी शंका व्यक्त करु लागले.

श्वेता बच्चनने शेअर केला ओरिजनल फोटो

यादरम्यान श्वेता बच्चनने ओरिजिनल फोटो शेअर केला आहे. फोटोत कुटुंबातील सर्व सदस्य दिसत असून, कोणालाही क्रॉप करण्यात आलेलं नाही.

कॅप्शनने वेधलं लक्ष

कॅप्शनमध्ये श्वेता बच्चनने लिहिलं आहे की, तुम्ही नेहमी प्रेमाने वेढलेले असता.

ऐश्वर्याला उत्तर?

यानंतर नेटकरी श्वेता बच्चनने अप्रत्यक्षपणे ऐश्वर्या रायला उत्तर दिलं असल्याचं म्हणत आहेत.

VIEW ALL

Read Next Story