Animal Movie

Animal Movie : 'त्या' इंटिमेट सीननंतर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत तृप्ती डिमरीचे फोटो व्हायरल

तृप्तीच्या सीनचीच चर्चा

'अॅनिमल' चित्रपटामुळं अभिनेत्री तृप्ती डिमरी एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली. तृप्तीच्या सीनचीच सध्या सर्वदूर चर्चा पाहायला मिळत आहे.

ऑनस्क्रीन केमिस्ट्री

रणबीर कपूरसोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तूफान गाजली. सोशल मीडियावर तर तिला अनेकजण 'नॅशनल क्रश' म्हणू लागले.

खास फोटो

अशी ही तृप्ती आता चर्चेत आली आहे ती म्हणजे एका अभिनेत्यासोबतच्या तिच्या खास फोटोंमुळं. जिथं ती त्याच्या मिठीत दिसत आहे.

हा अभिनेता कोण?

तृप्तीसोबत दिसणारा हा अभिनेता कोण? तुम्हालाही पडला ना प्रश्न? त्याच्यासोबतची तिची जवळीक आणि केमिस्ट्री पाहून तुमच्याही भुवया उंचावल्या ना?

विकी कौशल

हा अभिनेता आहे, विकी कौशल. त्याच्यासोबत ती 'महबूब मेरे सनम' या चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून त्यादरम्यानचे हे व्हायरल फोटो पाहता चित्रपटात तृप्ती आणि विकीची छानशी केमिस्ट्री पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही.

व्हायरल फोटो

आनंद तिवारी दिग्दर्शित या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण क्रोएशिला चित्रीत करण्यात आलं. याचेच काही फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story