रणदीप हुड्डा लग्नाआधी घोड्यांच्या 'या' मंदिरात का पोहोचला?

लग्न करतोय रणदीप

बॉलिवूडचा मोल्ट एलिजिबल बॅचलर रणदीप हुड्डा लग्न करतोय. 29 नोव्हेंबर रोदी लेड लव लिन लॅशरामसोबत लग्नबंधनात अडकणार.

वयाच्या 47 व्या वर्षी रणदीप 10 वर्षांनी लहान असलेल्या लिन लॅशरामसोबत इंटीमेट प्रकारे लग्न करणार आहो. हे प्रायव्हेट वेडिंग मणिपुरच्या इम्फालमध्ये होणाराय.

लग्नाकरता रणदीप गर्लफ्रेंडसोबत मणिपुरला पोहोचला आहे. सात फेरे घेण्यापूर्वी या कपलने एकत्र मंदिरात पूजा केली आणि भावी आयुष्यासाठी परमेश्वराचे आशिर्वाद घेतले.

रणदीपने अतिशय पारंपरिक पद्धतीने पेहराव केला होता. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये एक खास गोष्ट आहे.

रणदीपने Ibudhou Marjing Temple या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे मंदिर खास घोड्यांना समर्पित केले आहे. भारतातील काही मंदिरांपैकी हे खास आहे.

तसेच दोघांनीही लग्नापूर्वी श्री श्री गोंविदाजी मंदिरातही जाऊन आशिर्वाद घेतला.

रणदीप हुड्डाचे घोडा प्रेम आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्यामुळे अशा अनोख्या पद्धतीने त्याने आपल्या अतिशय खास दिवसाची आणि विधीची सुरुवात केलीय.

मणिपुरमध्ये सात फेरे घेतल्यानंतर रणदीप मुंबईत ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहे.

रणदीप बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्याने अगदी लग्नाच्या काही दिवसांपर्यंत आपलं नातं गुपित ठेवलं होतं.

रणदीप हुड्डाची नववधु ही 37 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 'मेरी कॉम', 'रंगून' सारख्या सिनेमात काम केलं आहे.

या दोघांना लग्नाच्या पोशाखात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत...

VIEW ALL

Read Next Story