प्रसिद्ध टेनिसपटू, एकाच वेळी दोघांशी रोमान्स अन्...; इंटरनेटवर 'ति'चीच चर्चा

'अर्श से फर्श पर'

ती एक प्रसिद्ध टेनिसपटू आहे. मात्र अचानक तिच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या की तिची अवस्था 'अर्श से फर्श पर' म्हणीसारखी झाली.

लव्ह ट्रँगलमध्ये अडकते

टेनिस जगतामध्ये नाव कमवण्याच्या उद्देशाने कोर्टवर घाम गाळणारी अचानक टेनिस चॅम्पियनशीपच्या विषयामधून लव्ह ट्रँगलमध्ये अडकते.

नवऱ्याची ट्रेनर होते अन्...

टेनिस खेळाडू होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेली ही तरुणी नंतर कोच होते आणि स्वत:च्या नवऱ्याला आपल्याच आधीच्या प्रियकराविरुद्ध जिंकण्यासाठी ट्रेन करते.

आगामी हॉलिवूड चित्रपट

ही कथा आहे 'चॅलेंजर्स' या आगामी हॉलिवूड चित्रपटाची. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री झेंडया (Zendaya) हिने.

सोशल मीडियावर Zendaya चीच चर्चा

'चॅलेंजर्स'चा पहिला ट्रेलर मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) प्रदर्शित झाला. ट्रेलर लॉन्चनंतर सोशल मीडियावर Zendaya चीच चर्चा आहे.

कोर्टवरील दृष्य चर्चेत

ट्रेलरच्या सुरुवातीला ताशी ही भूमिका साकारणारी Zendaya कोर्टवर सराव करताना दाखवली आहे. टेनिस कोर्टवरील दृष्यांसाठीची तयारी करण्याच्या दृष्टीने Zendaya ने विशेष मेहनत घेतली आहे.

एकाच वेळी दोघांशी रोमान्स

या ट्रेलरमधील एका दृष्यात ताशी ( Zendaya) पती आर्ट (माईक फाईस्ट) आणि आधीचा प्रियकर पॅट्रीक (जोश कॉनर) हे दोघेही एकाच वेळी Zendaya शी रोमान्स करताना दाखवण्यात आले आहेत.

बोल्ड सिन्स चर्चेत

'चॅलेंजर्स'च्या या ट्रेलरमधील काही बोल्ड सिन्स आणि किसिंग सिन्सनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लूक आणि अभिनयाचं कौतुक

या ट्रेलरमधील Zendaya चा लूक फारच भन्नाट असून ट्रेलरमधील स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. Zendaya च्या अभिनयाचंही कौतुक होत आहे.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

'चॅलेंजर्स' हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023 रोजी अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story