मसालेदार पदार्थ खाताय ? तुम्हाला 'हे' माहित असायला हवं...

चमचमीत आणि मसालेदार पदार्थ आपण नेहमीच आवडीने खात असतो.

पण तिखट, मसालेदार पदार्थही आरोग्यासाठी तेवढेच जास्त घातक ठरू शकतात.

अतिगोड प्रमाणेच अतितिखट, अतिमसालेदार जेवण देखील आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहे.

पोटात अ‍ॅसिड साठलेलं असतं आणि त्यात तुम्ही मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्याचा अधिक त्रास शरीराला होतो.

पोटाचा अल्सर

जठर किंवा लहान आतड्याच्या सुरूवातीच्या भागात जखम होते, पण जर हा आजार वाढत गेला तर अनेकदा रक्तस्त्राव होऊन शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते.

गरोदर महिलांनी खाऊ नये

गरोदर महिलांनी मसालेदार पदार्थांचे सेवन करावे. मात्र, जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मूळव्याध

जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन तुम्हाला मुळव्याधाचा त्रास होऊ शकतो.

छातीत जळजळ

जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले तर छातीत जळजळ होऊ शकते.

ताण

ज्या लोकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात, त्यांना तणावात ते खाण्याची जास्त इच्छा होऊ लागते.

VIEW ALL

Read Next Story