फ्लॉवर, ज्या भाजीकडे पाहून अनेकजण नाकं मुरडतात त्यापासून बनवलेले अनेक चवीचे पदार्थ खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता. फ्लॉवरची तंदुरी, फ्लॉवरचं ऑम्लेट, कटलेट असे पदार्थ खाऊन तुम्ही शरीराला प्रोटीन आणि फायबरचा पुरवठा करु शकता.
राजगिऱ्याचा पिठाची भाकरी, चटणी, राजगिऱ्याचे लाडू, चिक्की हे भूक भागवण्याचं उत्तम साधन ठरतात. आरोग्यासही त्याचे बरेच फायदे होतात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चकल्या खाऊनही तुम्ही वजन कमी करु शकता. इथं फक्त डीप फ्राय ऐवजी एअर फ्रायरचा वापर तुम्ही करु शकता. शिवाय डाळींच्या पीठासोबत तांदळाऐवजी नाचणीचं पीठ वापरू शकता.
ओमेगा 3 फॅटी अॅसिडनं परिपूर्ण असणाऱ्या चिया सीड्स वजन नियंत्रणात ठेवायला मोठी मदत करतात.
ताक हे एक कमीक कमी कॅलरी असणारं पेय आहे. वजन कमी करु इच्छिणाऱ्यांसाठी हे एक जादुई पेय आहे असं म्हणायला हरकत नाही.
आहारामध्ये मुगाची डाळ, डाळीच्या पीठाचा पोळा, मुगाच्या डाळीचा हलवा, डोसा अशा पदार्थांचा समावेश केल्यास त्याचा फायदा होतो. शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो.
तुम्हीही असेच बेत आखताय का? या प्रवासात जीभेचे चोचले पुरवून तुम्हीही वजन सहज कमी करू शकता. मुख्य म्हणजे या पदार्थांनी चरबीही झपाझप वितळेल असं म्हटलं जातं.
जंक फूड, फास्ट फूडला दूर लोटत त्याला पर्याय म्हणून अनेकजण आरोग्यदायी खाद्यपदार्थांना पसंती देतात. बऱ्याचदा या निर्णयासाठी आहारतज्ज्ञांचा सल्लाही घेतला जातो.
चवीने खा, बारीक व्हा! पाहा झपाझप चरबी वितळवणाऱ्या पदार्थांची यादी