उपाशी पोटी फळं खाताय ? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं, मात्र डॉक्टरांच्या माहितीनुसार उपाशी पोटी फळं खाल्ल्याने शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात, कोणती फळं रिकाम्या पोटी खाऊ नये...

पपई

त्वचेच्या आरोग्यासाठी पपई खाणं फायदेशीर असतं. मात्र पपईमध्ये पपेन नावाचा घटक असतो. त्यामुळे रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पोटात जळजळ होते.

अननस

अननसामध्ये व्हिटामीन सी ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. अननसात ब्रोमेलेन नावाचा घटक असतो. जर उपाशी पोटी अननस खाल्ला तर पोटात गॅस होण्याची शक्यता असते.

आंबा

फायबरयुक्त आंबा उपाशी पोटी खाल्ल्याने पचनसंस्था खराब होते. याशिवाय पोटाला सूज येण्याची शक्यता असते.

संत्री

संत्र्यामध्ये अ‍ॅसिडची मात्रा जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी संत्री खाल्ल्यास छातीत जळजळ होते.

द्राक्ष

द्राक्षात सारखेचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे उपाशी पोटी द्राक्षं खाल्ल्यास रक्कातील साखरेची पातळी वाढते.

सफरचंद

सफरचंद उपाशी पोटी खाल्ल्याने गॅस आणि अपचनाची समस्या होते. त्यामुळे सफरचंद जेवणानंतर खाणं फायदेशीर ठरतं.

केळी

उपाशी पोटी केळी खाल्ल्याने पचनसंस्था बिघडते. त्यामुळे नाश्ता किंवा जेवणानंतर केळी खाणं फायदेशीर ठरतं.

पेर

पेरमध्ये फायबरची मात्रा जास्त असते, त्यामुळे पेर उपाशी पोटी खाल्ल्याने अपचनाचा त्रास होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story