मेथीदाणे

मेथीदाणे सांधेदुखीपासून आराम देतात. तसेच ते पोटासाठीही फायदेशीर आहे, त्यामुळे ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. यासाठी मेथीदाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्या.

पिस्ता

पिस्ते भिजवल्याने ते मऊ होतात आणि त्यांचे पौष्टिक मूल्य वाढते. सकाळी पिस्ता आणि अक्रोड सारख्या नट्सचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

अंजीर

जर तुम्ही अपचन, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर अंजीर तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरेल. अंजीर आतडे स्वच्छ करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

अक्रोड

पाण्यात दोन मोठे अक्रोड भिजवून सकाळी उठल्यावर सेवन करा. अक्रोड तुमची मेंदूची शक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतो.

काळे मनुके

काळ्या मनुकांमध्ये भरपूर फायबर असते आणि जर तुम्ही सकाळी हे मनुके खाल्यातर आतड्याची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध टाळण्यास मदत होते.

बदाम

5-7 बदाम रात्रभर भिजत ठेवून खाल्यानंतर बदाम हे व्हिटॅमिन ई आणि बी6 चा उत्तम स्रोत असून मेंदूच्या पेशींमध्ये प्रथिने शोषण्यास मदत करते.

ड्रायफ्रुट्स किंवा नट्स खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही, पण भिजवून खाल्ल्यास त्यांची क्षमता दुप्पट होते. चला जाणून घेऊया की भिजवल्यानंतर कोणत्या गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story