हिवाळ्यात लोकांना अनेकदा दात वाजण्याची समस्या उद्भवते. हे अगदी सामान्य आहे. पण असे का होते याचा कधी विचार केला आहे का?

हिवाळ्यात दात वाजत असल्यास सावध राहण्याची गरज आहे. हा महत्त्वाचा इशारा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

दात वाजण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाहेरचे तापमान सामान्य नसल्यामुळे दात कुडकुडले जातात. दात कुडकुडल्यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते व शरीरात उर्जा निर्माण होऊ लागते.

जेव्हा आपलं शरीर थंड पडतं अशावेळेस डोक्यात असणारे हायपोथेलेमस हा भाग शरीराला सूचना देतो. त्यामुळे ऊब हवी गरज लक्षात घेऊन शरीर गरम व्हायला सुरुवात करते.

या सचनेनंतर शरीरात काम करणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात ऊब निर्माण करण्यासाठी काम करू लागतात. जेव्हा शरीरात पेशी मोठ्या प्रमाणात हे काम करू लागतात तेव्हा तुमचं शरीर लगेचच गरम होण्यास सुरुवात होते.

तसंच जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील पेशी मोठ्या प्रमाणात काम करू लागतात तेव्हा तुमचे दात एकमेकांसोबत आदळतात आणि यामुळेच तुमच्या दातांचे वाजणे सुरू होते. दात वाजल्यामुळे तुमच्या शरीरात लवकरात लवकर उर्जा निर्माण होऊ लागते.

तज्ञांच्या मते, अंग थरथरणे ही एक अनैच्छिक क्रिया आहे, ज्याद्वारे आपले शरीर स्वतःला सक्रिय बनवते. जर त्याला ताबडतोब उबदारपणा न मिळाल्यास तो हायपोथर्मियाला बळी पडू शकतो, जे घातक ठरू शकते.

VIEW ALL

Read Next Story