Weight Gain

Weight Gain : शाकाहारीच आहात? वजन वाढवण्यासाठी आवर्जून खा 'या' 5 गोष्टी (सर्व छायाचित्र सौजन्य- फ्रीपिक)

आरोग्यदायी आयुष्य

आरोग्यदायी आयुष्य आणि सुदृढ शरीरयष्टी कोणाला नको असते? पण, काही जणांच्या हाती मात्र या बाबतीत निराशाच लागते. खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, सवयी या साऱ्याचे परिणाम थेट शररीयष्टीवर होतात आणि त्यामुळं अनेकांचं वजनच वाढत नाही.

काहीजण शाकाहारावर ठाम

ही मंडळी बऱ्याचदा अशक्त आणि निरुत्साही दिसतात. आता इथंही दोन गट पडतात, अनेकांच्या मते वजन वाढण्यासाठी मांसाहार गरजेचा तर काहीजण शाकाहारावर ठाम राहतात.

तुम्हाला माहितीये का...

तुम्हाला माहितीये का शाकाहारी आहारातूनही शरीराला आवश्यक तत्वं मिळवून देता येतात. नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यासाठी काही शाकाहारी पदार्थांचं नियमित सेवन कायमच फायद्याचं ठरतं. चला पाहूया असेच काही पदार्थ...

दूध आणि केळं

केळ्यामध्ये असणाऱ्या कॅलरी शरीराला उर्जा देतात. दूध आणि केळं एकत्र करून खाल्ल्यास प्रोटीन सप्लीमेंटप्रमाणं ते शरीरावर परिणाम करतात.

दूध आणि बदाम

5-6 बदाम रात्री पाण्यात भिजवून, सकाळी त्याची साल काढून ते बारीक करत दुधात मिसळून खाल्ल्यास यामुळंही वजन वाढण्यास मदत होते.

चणे आणि खजूर

खजूर आणि चणे एकत्र खाण्यानंही वजन वाढवण्यास मदत होते. या दोन्ही घटकांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक पोषक तत्त्वं मिळतात.

तूप, बटर आणि सुकामेवा

तुपात किंवा Butter मध्ये सुकामेवा मिसळून हे मिश्रण काही काळासाठी भाजून त्याचं सेवन केल्यास शरीराला आवश्यक घटक पुरवले जातात.

बटाटा

वजन वाढवण्यासाठी अनेकदा बटाटा खाण्याचाही सल्ला दिला जातो. यामध्ये असणारी कार्बोदकं आणि प्रथिनं शरीराला फायद्याची ठरतात. (वरील माहिती पूर्णपणे सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक निर्णय घेण्याआधी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

VIEW ALL

Read Next Story