नखांचा रंग पाहून ओळखा तुम्हाला कोणता आजार आहे?

नखांची चमक जाणे

नखांची चमक जाणे, शरीरात पोषकतत्वांची कमतरता किंवा इन्फेक्शनकडे इशारा करते.

गडद रंगाची नखे

जर तुमच्या नखांचा रंग तपकिरी किंवा खुप गडद असेल तर थायरॉईड किंवा शरीरात पोषकतत्वांची कमतरता असू शकते.

निळ्या रंगाची नखे

या रंगाची नखे असतील तर शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही. हा फुफ्फुसाच्या समस्येचा संकेत असू शकतो. काही हृदयाच्या समस्यांमध्ये नखे निळी होऊ शकतात.

पिवळी नखे

पिवळ्या नखाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक फंगल संसर्ग आहे. थायरॉईड रोग, काविळ, फुफ्फुसाचा आजार, डायबिटीज किंवा सोरायसिस.

पांढरे डाग, किंवा पांढरी नखे

जर नखावर पांढरे डाग किंवा संपूर्ण नखेच पांढरी झाली तर हे लक्षणे व्यक्तीच्या लीव्हर किंवा हृदयासंबंधी समस्यांचे असू शकते.

वक्राकार नखे

ज्या लोकांची नखे वक्र असतात त्यांना काही ना काही अनुवांशिक आजार, लीव्हरसंबंधी समस्या, हायपोक्रोमिक अ‍ॅनिमियाचा संकेत देणारा कायलोंनायचिया आजारसुद्धा असू शकतो.

जाड नखे

नखे जाड होणे एक नव्हे तर अनेक आजारांचे लक्षण असू शकते. मधुमेह, फुफ्फुसात संसर्ग, अर्थरायटिस इत्यादीचे लक्षण असू शकते.

नखांची चमक जाणे, कोरडी, कमजोर होणे

जर नखाची चमक गेली आणि ती दिसण्यास कोरडी आणि कमजोर वाटू लागली तर थॉयरॉईडसारख्या समस्येने ग्रस्त असल्याचे हे लक्षण आहे.

VIEW ALL

Read Next Story