असा ओळखा भेसळयुक्त मध

बोटावर मध घ्या. शुद्ध मध बोटाच्या टोकावर स्थिर राहतो अन्यथा तो भेसळयुक्त मध असतो.

हा पण एक प्रकार आहे

शुद्ध मध हा जाड असतो. त्याचा एक थेंब अंगठा आणि बोटाच्या मध्ये धरा. जर तार तयार झाला तर हे मध शुद्ध आहे.

ही पद्धत वापरून बघा

टिश्यू पेपर घ्या. त्यावर मधाचा एक थेंब टाका. मध कागदावरच थांबून राहिल्यावर ते शुद्ध आहे.

वापरा 'या' टिप्स!

एका काडीवर कापूस लावून त्याला मध लावा. आता ही काडी जळत्या मेणबत्तीवर धरा. कापूस जळण्यास सुरवात झाली तर मध शुद्ध आहे.

मधात भेसळ तर नाही ना?

एका वाटीत गरम पाणी घ्या. त्यात एक चमचा मध घाला. मध ताबडतोब पाण्यात विरघळला तर तो भेसळयुक्त (Fake Honey) आहे.

VIEW ALL

Read Next Story