फास्ट फूड

एक प्लेट पापडी चॅटमध्ये 240, एक प्लेट पाणीपुरीमध्ये 100, एक प्लेट आलू टिक्कीमध्ये 300, एक प्लेट पकोडेमध्ये 340 कॅलरी असतात. सर्वात जास्त कॅलरी ही फास्ट फूडमध्ये असतात.

भाजी

भाज्यांमध्ये 100 ग्रामच्या हिशोबाने बोलायचे झाले तर, पालकमध्ये 25, टोमॅटोमध्ये 17, कोबीमध्ये 27, गाजरमध्ये 30, भोपळ्यामध्ये 16 कॅलरीचा समावेश असतो.

फळ

एका सफरचंदमध्ये 81 , एवोकाडोमध्ये 306 कॅलरी, केळ्यामध्ये 105, आंब्यामध्ये 135 आणि संत्रीमध्ये 65 कॅलरीचा समावेश असतात.

न्यूडल्स

100 ग्राम न्यूडल्समध्ये 402 कॅलरी असतात तर गरमागरम आणि चविष्ठ समोसामध्ये 156 कॅलरी असतात. त्यामुळे चविष्ठ पदार्थ खाण्यापूर्वी नक्कीच विचार करा.

चपाती

गव्हाच्या चपाती जवळपास 30 ग्राम चपातीमध्ये 73 कॅलरी आणि 1 वाटी तांदळामध्ये 140 कॅलरी असतात. तर एक वाटी भाजीमध्ये 32 ते 40 कॅलरी असतात.

पोहे आणि चहा

साप्ताहिक सुट्टी असेल तर अनेकजण पोहे म्हणूनच नाश्ता बनवतात. पण पोहेच्या 1 प्लेट (जवळपास 150 ग्राम) मध्ये 180 कॅलरी असतात. तर त्याच्यासोबत चहा घेतली तर 102 कॅलरी असतात.

जॅम-ब्रेड

अनेकजण नाश्ता म्हणून जॅम-ब्रेड खातात. पण याच 100 ग्राम जॅम मध्ये 290 कॅलरी असातत. तर व्हाईट ब्रेडच्या 1 स्लाइसमध्ये 69 कॅलरी असतात.

कॅलरी कसे मोजायचे

कोणत्याही पदार्थाचे कॅलरी मोजण्यासाठी एक ग्रॅम पदार्थ जाळला जातो. जळल्यामुळे निर्माण होणारी उष्णता कॅलरीमीटर नावाच्या उपकरणाद्वारे मोजली जाते. त्याच उष्णतेला त्या पदार्थाचे उष्मांक म्हणतात.

किती कॅलरी?

अगदी लहान मुलाला 500 कॅलरीज, आठ वर्षाच्या मुलाला 1000 कॅलरीज, तरुणीला 1300 कॅलरीज आणि तरुण मुलाला 1500 कॅलरीज लागतात. 6 तास शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तीची गरज 2700 कॅलरीजपर्यंत वाढते.

किती कॅलरी लागतात?

एक सामान्य व्यक्ती रोजच्या अन्नातून सरासरी 2100-2200 कॅलरीज घेते. शहरी भागात सरासरी 2169 कॅलरीज आणि ग्रामीण भागात 2214 कॅलरीज असणे आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story