दिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!

दिवसभर मोबाईलमध्ये घुसून असाल तर सावधान! असे केल्यास तुमचे बाप बनायचे स्वप्न भंगू शकते.

सतत फोन वापरल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू कमीची समस्या जाणवते.

स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठाच्या एका टीमने 2005 ते 2008 मध्ये एक संशोधन केले.

यात 18 ते 22 वर्षांचे 2,866 स्वीस तरुण सहभागी झाले. या डेटावरुन एक क्रॉस सेक्शनल स्टडी करण्यात आला.

यानंतर मोबाईल फोन आणि शुक्राणूतील संबंध समोर आला.

पुरुषांच्या एका ग्रुपमध्ये शुक्राणू संख्या (56.5 मिलियन) इतकी जास्त होती. जे आठवड्यातून एक किंवा दोनदाच मोबाईल वापरतात.

दुसऱ्या ग्रुपमधील पुरुषांच्या शुक्राणुची संख्या 15 मिलियनपेक्षा कमी होती. अशा अवस्थेत गर्भधारणा करण्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल.

शुक्राणूची संख्या 40 मिलिनय प्रति MI पेक्षा कमी असेल तर गर्भावस्थेची शक्यता कमी होते.

एका स्टडीनुसार गेल्या 50 वर्षात पुरुषांच्या स्पर्म गुणवत्तेत कमी आली आहे.

VIEW ALL

Read Next Story