'या' डाएटच्या मदतीने Breakup नंतर तिने 95 Kg वजन केलं कमी

तिचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा पण तितकाच प्रेरणादायी असून त्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हालाही नक्कीच आवडेल...

एवढं वजन कमी केलं की...

एका तरुणीने ब्रेकअपनंतर स्वत:मध्ये बदल घडवण्यासाठी एवढं वजन कमी केलं आहे की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

पूर्वी किती होतं वजन?

या तरुणीचं वजन पूर्वी 171 किलो इतकं होतं. मात्र आता तिने आपलं वजन 95 किलोंनी कमी केलं आहे.

आज वजन 76 किलो

म्हणजेच ब्रेकअपआधी 171 किलो वजन असणारी ही तरुणी आज 76 किलोची झाली आहे.

अभूतपूर्व ट्रान्सफॉर्मेशन

या तरुणीच्या अभूतपूर्व ट्रान्सफॉर्मेशनचं वृत्त 'डेली स्टार'ने दिलं आहे.

नाव काय आणि कधीपासून कमी करतेय वजन?

या महिलेचं नाव स्टेफनी स्मिथ (Stephanie Smith) असं आहे. या तरुणीने वायच्या 28 व्या वर्षी वजन कमी करण्यास सुरुवात केली.

वयाच्या 18 व्या वर्षापासून त्रास

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या स्टेफनीला स्थूलपणाचा म्हणजेच वजन वाढण्याचा त्रास वयाच्या 18 व्या वर्षापासून होता.

वजन 171 किलो झालं

चॉकलेट, गोड पदार्थ आणि जंक फूड खाऊन स्टेफनीचं वजन वयाच्या 27 व्या वर्षी 171 किलो झालं होतं.

दिवसभर खात राहायची

कॉलेजमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर स्टेफनी डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे ती दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी खात राहायची.

4XL आकाराचे कपडे

स्टेफनीला आधी 4XL आकाराचे कपडे घ्यावे लागायचे. जसजसं वजन वाढत गेलं तसे स्टेफनीला आरोग्यासंदर्भातील समस्या जाणवू लागल्या.

वाढत्या वजनामुळे समस्या

वाढलेल्या वजनामुळे स्टेफनीला झोपेची समस्या, पाय दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या जाणवू लागल्या.

वजन कमी करण्याचा निर्णय

ब्रेकअपनंतर स्टेफनीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने 2017 मध्ये गॅस्ट्रिक स्लीव सर्जरी करुन घेतली.

भूक कमी झाली अन् वजनही

या सर्जरीमुळे स्टेफनीची भूक कमी झाली आणि 2017 मध्येच तिचं वजन 54 किलोंनी कमी झालं.

या दोन गोष्टी तिने सोडल्या

वजन कमी करण्यासाठी तिने प्रोटीन शेक, चिकन आणि हिरव्या भाज्यांचं अधिक सेवन करण्यास सुरुवात केली. तिने बटाटा, चीज यासारख्या गोष्टी सोडून दिल्या.

ब्रेफास्टला काय खायाची?

स्टेफनी वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये ब्रेकफास्टला प्रोटीन शेक प्यायची. त्यानंतर लंचमध्ये पुन्हा प्रोटीन शेक आणि अर्ध सॅण्डवीच तसेच सॅलेड ती खायची.

रात्रीच्या जेवणात...

रात्रीच्या जेवणामध्ये ती चिकन आणि भाताबरोबरच पनीर तसेच प्रोटीन शेक प्यायची.

ड्रिंक्समध्ये फक्त...

ड्रिंक्समध्ये स्टेफनी फक्त कॉफी, शुग फ्री कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि सोडा प्यायची.

आता उरली थोडीच अतिरिक्त चरबी

हळूहळू स्टेफनीचं वजन कमी होऊ लागलं. आता तिच्या बॉडीवर 6 ते 7 किलोची अतिरिक्त चरबी उरली आहे.

आता करतेय पैशांची बचत

स्टेफनी आता ही चरबी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रीया करायची म्हणून पैशांची बचत करत आहे. या सर्जरीसाठी तिला 8.19 लाख रुपयांची आवश्यकता आहे.

व्यायाम सुरु केला

स्टेफनीने आपल्या 23 वर्षीय ब्रॉयफ्रेण्डला म्हणजे डॅनिएलला भेटल्यानंतर रोज व्यायाम सुरु केला आणि त्याचा परिणाम दिसू लागला. डॅनिएल स्वत: एक पर्सनल ट्रेनर म्हणून काम करतो.

अवेळी खाणं थांबलं

डॅनिएलने स्टेफनीला अवेळी लागणाऱ्या भुकेसंदर्भात काय करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यामुळे अधिक पौष्टीक खाणं आणि व्यायाम स्टेफनीचं डेली रुटीन झालं.

हा प्रवास खरोखर थक्क करणारा आणि प्रेरणादायी

स्टेफनीच्या या ट्रान्सफॉर्मेशनमधून नक्कीच आपल्यालाही प्रेरणा घेता येईल. तसेच यामधून ठरवल्यास काहीही अशक्य नसतं हेही अधोरेखित होत आहे.

VIEW ALL

Read Next Story