त्याचप्रमाणे बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात असते. सूर्यफूल बिया आणि तेल देखील व्हिटॅमिन ईचे चांगले स्त्रोत असतात.

ड्राय फ्रुट्स किंवा सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय आहारात अॅवोकॅडोचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत असतो.

त्याउलट जर शाकाहारी असाल तर तुम्ही संपूर्ण धान्य, बीन्स, मसूर, बटाटे किंवा सुका मेवा घेऊ शकता. हे सर्व ब जीवनसत्त्वांचे चांगले स्रोत आहेत. दुग्धजन्य पदार्थांमधूनदेखील व्हिटॅमिन बी चांगले मिळते.

शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणात व्हिटॅमिन बी असतात. जर तुम्ही मांसाहार खात असाल तर तुमच्या आहारात मांस, मासे, चिकन यांचा समावेश करा.

जर तुम्हाला मुंग्या येण्याची समस्या असेल तर तुम्ही चाचणी करून घ्या. तुमच्या आहारात ज्या जीवनसत्त्वांची कमतरता असेल त्यावर लक्ष देत योग्य तो आहार घ्या.

खूप वेळ एकाच स्थितीत बसल्याने मुंग्या येणे हे तर नेहमीचेच आहे. मात्र सतत जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर ते व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ईच्या कमतरतेचे लक्षण आहे.

अनेकदा खूप वेळ बसल्यानंतर पायाला किंवा हाताला गुदगुल्या होतात किंवा संवेदना येतात. याला बरेच लोक याला मुंगी चावणे असेही म्हणतात. परिणामी शरीरात मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते.

VIEW ALL

Read Next Story