लिव्हर खराब होण्याची 'ही'आहेत लक्षणे ...

अस्वस्थ वाटते

छोट्या कारणांवरुन अस्वस्थ वाटु लागते. सतत अस्वस्थ वाटत राहणे, चिडचिड झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

पोटात पाणी होणे

जेव्हा लिव्हर योग्यरित्या काम करत नाही तेव्हा पोटात पाणी होण्याचा आजार होतो.यकृतातील सिरोयसिसमुळे पोटात पाणी जमण्याची समस्या निर्माण होते.

भूक कमी लागते

लिव्हरची समस्या असल्यास भूक मंदावते. त्यामुळे जेवण खाण्याचे प्रमाण कमी होते.

थकवा जाणवतो

मेंदुतील न्युरोट्रान्समिनमुळे कोणतेही काम न करताच थकवा जाणवू लागतो.

पोटाच्या वरील भागात स्पर्श केल्यास वेदना होतात

पोटावरुन हात फिरवल्यास किंवा पोटाला स्पर्श केल्यास पोट दुखत असेल तर याची गंभीर नोंद घ्या.

लघवीचा रंग बदलतो

शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणाऱ्या द्रवाचा रंग गडद पिवळा दिसू लागतो.

कावीळ होते

शरीर तसेच डोळे पिवळसर दिसू लागतात. त्यामुळे कावीळ होते.हे खराब लिव्हरचे लक्षण आहे.

अचानक वजन कमी होणे

अचानक कमी होणारे वजन हे धोक्याची घंटा आहे. यामुळे तुमचे लिव्हर डॅमेज व्हायला सुरुवात होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story