टेट्रा पॅकमध्ये कित्येक दिवस राहूनही दूध खराब कसे होत नाही? हे आहे कारण!

आपल्या प्रत्येकाच्या घरी दूध दररोज वापरलं जातं. हल्ली दूध अनेक दिवस टिकवण्यासाठी टेट्रा पॅक वापरले जाते.

पण तुम्हाला माहित आहे का, टेट्रा पॅकमध्ये दूध का खराब होत नाही. तसेच हे कसे तयार केले जाते. यामध्ये कोणतेही केमिकल तर नाही ना?

आज जाणून घ्या, तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याअगोदर टेट्रा पॅक किती प्रकारच्या प्रक्रियांमधून जाते. याच्या पॅकेजिंगमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते.

दूधाला 6 लेअरच्या टेट्रा पॅक डब्यात भरण्याअगोदर सर्वात जास्त तापमानात गरम केले जाते.

ज्या तापमानावर दूध गरम केले त्याच तापमानावर ते दूध थंड केले जाते. दूधाला सर्वाधिक गरम करून नंतर थंड केले जाते.

अशा पद्धतीने दूधात असलेले हानिकारक बॅक्टेरिया नष्ट केले जातात. यानंतर दूधाला टेट्रा पॅकमध्ये बंद केले जाते.

पॅकेटवाले दूध किंवा टेट्रा पॅक दूध सामान्यपणे स्टोअर किंवा दुकानात पोहोचेपर्यंत खूप वेळ लागतो. दूध लवकर खराब होऊ नये म्हणून त्याला पॉश्चराइज केलं जातं.

दूधाला पॉश्चराइज केल्यामुळे यामध्ये असलेले सर्व बॅक्टेरिया नष्ट होतात. आणि त्याची सेल्फ लाइफ काही दिवस वाढते.

टेट्रा पॅक दुधाच्या एक एक प्रोसेसला शुद्ध आणि सुरक्षित करतात. ज्याला तुम्ही सरळ पॅकमधून काढून पिऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story