दुपारी जेवल्यानतर झोप येण्याचे कारण पचनक्रियेशी संबंधित आहे.

जेवल्यानंतर शरीरात पचनक्रिया सुरू होते. यावेळेस पचन संस्थांना अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते.

अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंझाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते.

अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो.

परिणामी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो.

मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने थकवा आणि आळस येतो आणि झोपही येऊ लागते.

दुपारच्या जेवणात कमीत कमी कॅलरी असाव्यात. हलका आहार घ्या. जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्याने जास्त झोप येते.

VIEW ALL

Read Next Story