सी सेक्शननं बाळाला जन्म दिल्यानंतर Lower Back मध्ये का होतो महिलांना त्रास?

नॉर्मल नाही तर सी सेक्शन डिलिव्हरी करतात

अनेक महिलांची हेल्थ कंडीशन पाहता तिची नॉर्मल डिलीव्हरी करणं शक्य होत नाही. तेव्हा अनेकवेळा डॉक्टर सी सेक्शन डिलिव्हरी करण्याचा सल्ला देतात.

सी सेक्शनमुळे होतात वेदना

सी सेक्शन केल्यानंतर अनेक महिलांना पाठीच्या खालच्या भागात त्रास होतो.

डॉक्टर ही काळजी घेण्यास सांगतात

सी सेक्शन म्हणजेच सिझेरियन झाल्यानंतर डॉक्टर महिलांना वजनदार वस्तू उचलू नका असा सल्ला देतात.

वजन न उचलण्याचा सल्ला का देतात?

वजनदार वस्तू उचल्यानं मणक्यावर ताण येऊ शकतो. काही महिन्यांनंतर हा त्रास जातो तो पर्यंत काही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असते.

वाढलेलं वजन

प्रेग्नंसीमध्ये अनेक महिलांचं वजन वाढते अशात जेव्हा तुमचं वजन कमी होईल तेव्हा तुमच्या पाठीवर आणि मणक्यावर कमी ताण पडेल.

मानेचं दुखणं

बाळाला दुध कसं पाजतात हे अनेक महिलांना माहित नसते म्हणून सुरुवातीला त्या चुकीच्या पद्धतीनं बसतात त्यामुळे मानेवर तान येतो आणि पाठ दुखू लागते.

थायरॉईडचा त्रास

प्रेग्नंसीमुळे अनेकांना थायरॉईडचा त्रास होऊ लागतो अशात बाळाला जन्म दिल्यानंतर सांधे दुखी, गुडघ्याच्या हाडांना त्रास पेल्विकमध्येही त्रास होऊ लागतो.

हार्मोन्स बदलण्याचे कारण

प्रेग्नंट असताना महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात अशात हार्मोनल बदल देखील होतात. तर सी सेक्शनच्या मदतीनं बाळाला जन्म दिल्यानंतर हार्मोन्स आधीसारखे होऊ लागतात. त्यामुळे वेदना होतात.

अॅनेस्थेशियामुळे होतो त्रास

सी सेक्शनवेळी अॅनेस्थेशिया देण्यात येते. त्याचा प्रभाव जास्त वेळ राहिण्यानं पाठ दुखीपासून मणका दुखीपर्यंत अनेक समस्या होऊ शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story