जगातील प्रत्येक सहावा मृत्यू 'या' रोगामुळे; नेमकं काय काळजी घ्यावी?

जगभरात कॅन्सरचा धोका वाढतोय ज्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत्ये आणि दरवर्षी लाखो मृत्यू होतात.जगातील प्रत्येक सहावा मृत्यू कर्करोगामुळे होतो असा तज्ज्ञ दावा करतात. दररोज आपल्या शरीरात सतत नवीन पेशी तयार होत असतात ही प्रक्रिया सतत चालू असते. शरीरातील कोणत्याही पेशींमध्ये असामान्य वाढ होत राहिल्यास त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होते.

सतत घसा खवखवणे, गिळताना हलका त्रास होतो, अधूनमधून कर्कशपणा, उच्चार कर्कशपणा किंवा आवाज बदल, अस्पष्ट वजन कमी होणे, श्वास घेण्यात अडचण, मानेमध्ये सूज ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात.तुमच्या शरीरात असे लक्षण आढल्यास त्वरीत उपचार सुरु करा.

धुम्रपान, मद्यपान,लठ्ठपणा आणि असुरक्षित सेक्स यासारख्या जीवनशैलीच्या सवयी कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. ज्या लोकांच्या कुटुंबात आधीच कर्करोग आहे त्यांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशन आणि ग्लोबोकॅनच्या 2020 यांच्या डेटानुसार महिलांमध्ये ब्रेस्ट, सर्व्हाइकल, ओरल कॅव्हिटी आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाणात जास्त वाढ आहे. तर पुरुषांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये लिप, ओरल कॅव्हिटी, फुप्फुसांचा कॅन्सर, कॅन्सरचे प्रमाण जास्त दिसुन येते.

वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञाचा जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.

कॅन्सरचे वेळेवर उपचार झाल्यामुळे रुग्ण जगण्याची शक्यता वाढते. कर्करोगाचे अनेक उपचार सर्वत्र उपलब्ध आहेत. कॅन्सरच्या स्टेज कोणता या परिस्थितीनुसार त्याच्यावर उपचार, औषधे, थेरपी, शस्त्रक्रिया केली जाते.

VIEW ALL

Read Next Story