रामायण

'रामायणा'तील कलाकारांना त्या काळात किती मानधन मिळालेलं?

मालिकेला कमाल लोकप्रियता

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली आणि इतक्या वर्षांनंतरही या मालिकेला प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळताना दिसत आहे.

कलाकारांच्या भूमिका

अशा या मालिकेमध्ये अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहिरी यांनी राम, सीता आणि लक्ष्मणाच्या भूमिका साकारल्या होत्या. या भूमिकांसाठी त्यांना किती मानधन मिळालेलं माहितीये?

भूमिकांनी वेधलं लक्ष

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धर्तीवर अयोध्येमध्ये पोहोचलेल्या या तिन्ही कलाकांनी पुन्हा एकदा साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आणि त्यातच गोविल यांनी त्यांच्या मानधनावरून पडदा उचलला.

किमान मानधन

किती मानधन मिळालं होतं? असा प्रश्न विचारला असता, तुम्ही चणे- शेंगदाणे विकत घेता ना तितकंच मानधन होतं, असं ते म्हणाले.

मनापासून साकारलेली भूमिका

रामाची भूमिका आपण पैशांसाठी केली नसून, मनापासून ती भूमिका साकारावीशी वाटत होती, म्हणून साकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मानधनाची रक्कम

उपलब्ध माहितीनुसार 'रामायण'मधील भूमिकांसाठी अरुण गोविल यांना 40 लाख रुपये, दीपिका चिखलिया यांना सीतेच्या भूमिकेसाठी 20 लाख रुपये आणि लक्ष्मण साकारणाऱ्या लहिरी यांना 25 लाख रुपये (संपूर्ण शोसाठी) इतकं मानधन मिळालं होतं.

VIEW ALL

Read Next Story