कोवलम (Kovalam)

केरळच्या तिरुवअनंतपूरमपासून 16 किमी अंतरावर असणाऱ्या कोवलम येथे तुम्ही स्कुबा डाईव्ह करु शकता. इथं स्कुबा गिअरऐवजी अंडरवॉटर स्कूटर म्हणजेच बाँड समबरीनचा वापर केला जातो. (छाया सौजन्य- Thrillophilia)

तारकर्ली (Tarkarli)

खिशाला परवडणाऱ्या दरात तुम्ही महाराष्ट्रातील तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग करू शकता. ऑक्टोबर ते एप्रिल हा इथं येण्यासाठीचा उत्तम काळ.

नेत्रानी आयलंड (Netrani Island)

कर्नाटकातील मुरुडेश्वर मंदिरापासून 18 किमी अंतरावर असणाऱ्या नेत्रानी किंवा पिजन आयलंड येथे तुम्ही स्कुबा डाईव्ह करू शकता. कोरल आयलंड असल्यामुळं तुम्हाला इथं कोळंबी आणि त्याचे अनेक प्रकार पाहायला मिळू शकतील.

पाँडीचेरी (Pondicherry)

पाँडीचेरी येथील Coral Sharks Reef इथं स्कुबा करण्याचा तुमचा अनुभव अद्वितीय असेल. कारण इथं समुद्राची खोली 5 मीटरपासून 23 मीटरपर्यंत आहे. त्यामुळं नवखे असाल तरीही तुम्हाला इथं स्कुबाचा आनंद घेता येईल. (छाया सौजन्य- Thrillophilia)

अगत्ती बेट (Agatti Island)

लक्षद्वीप येथील अगत्ती बेटावर ल्कुबा डाईव्ह करताना तुम्ही रंगीबेरंगी समुद्री खडक, विविध प्रकारचे मासे आणि समुद्री वनस्पती पाहू शकता. इथं समुद्राचं पाणी प्रचंड स्वच्छ असल्यामुळं तुम्हाला मिळणारा अनुभव कमाल असतो.

स्वराज दीप बेट (Swaraj Deep)

अंदमान आणि निकोबार बेट समुहामध्ये स्वराज दीप नावाचं बेट हे सर्वाधिक विकसित अंडाकृती बेट आहे. पोर्ट ब्लेअरपासून 50 किमी अंतरावर असणाऱ्या या बेटावर 7 समुद्रकिनारे आहेत. इथं तुम्ही स्कुबा डाईव्ह करू शकता. (छाया सौजन्य - Andaman World Travels Pvt Ltd)

Best Scuba Diving Places In India: 'ही' आहेत भारतातील स्कुबा डायव्हिंगसाठीची सर्वोत्तम ठिकाणं;

VIEW ALL

Read Next Story