हे खरंय!

हे खरंय! अंबानींच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारनंच केली खरेदी

कर्जाचा अमाप बोजा

Reliance News : कर्जाचा अमाप बोजा असणाऱ्या उद्योजक अनिल अंबानी यांची मालकी असणारी रिलायन्स पॉवर या कंपनीच्या अरुणाचल प्रदेशातील दोन हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टना टीएचडीसी इंडिया लिमिटेडला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

कोट्यवधींचा व्यवहार

तब्बल 128.39 कोटी रुपयांना हा व्यवहार पार पडला आहे. उपलब्ध माहितीनुसार अरुणाचल प्रदेश सरकार, कलाई पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि टीएचडीसी इंडिया लिमिटेडकडून यासंदर्भातील करारावर सप्टेंबर महिन्यातच स्वाक्षरी करण्यात आली होती.

कधीकाळी गुंतवणूकदारांची पसंती

शेअर बाजारात कधी एकेकाळी अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर ही गुंतवणूकदारांची पसंती सातत्यानं मिळवणारी एक कंपनी होती.

आयपीओमध्ये रेकॉर्ड बोली

जानेवारी 2008 मध्ये तर या कंपनीला आयपीओमध्ये रेकॉर्ड बोली मिळाली होती. त्यावेळी रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत प्रती शेअर 261 रुपये इतकी होती.

वार्षिक उत्पन्नाचा आकडा

2007 मध्ये फोर्ब्स इंडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार अनिल अंबानी यांच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा 45 बिलियन अब्ज डॉलर इतका होता.

उत्पन्न घसरलं...

घसघशीत वार्षिक उत्पन्न असणारे अनिल अंबानी त्यावेळी देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. पण, आता मात्र त्यांच्या वार्षिक उत्पनाचा आकडा घसरला असून, रिलायन्स पॉवरच्या शेअरची किंमत 24.13 रुपयांवर आदळला आहे.

VIEW ALL

Read Next Story