लिफ्टमध्ये आरसे का असतात?

लिफ्टमध्ये आरसे का असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असण्याची शक्यता अधिक आहे.

कसे दिसतोय पाहण्यासाठी असेल असं म्हणत असाल तर...

हे आरसे लिफ्टने जाणाऱ्यांना ते कसे दिसतात बघण्यासाठी असतात असं तुमचं उत्तर असेल तर ते चुकीचं आहे.

बरीच कारणं

लिफ्टमध्ये आरसे असण्यामागे काही विशेष कारणं आहेत. यापैकी बरीच कारणं ही मानसिक दृष्टीकोनातून असून ती नेमकी कोणती हे पाहूयात...

असाही फायदा

लिफ्टमध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाताना नक्कीच मनात एक भीती असते. त्यामुळेच समोरची व्यक्ती काय करत आहे याकडे लक्ष ठेवण्यास हे आरसे मदत करतात.

आरसे असलेल्या लिफ्टमध्ये...

आरसे असलेल्या लिफ्टमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्यास त्याबद्दल लगेच प्रतिसाद देण्याचं प्रमाण हे आरसे नसलेल्या लिफ्टपेक्षा अधिक असतं.

लिफ्टमध्ये आरसा बंधनकारक

द जपान एलिव्हेटर असोसिएशनच्या नियमानुसार प्रत्येक लिफ्टमध्ये आरसा बंधनकारक आहे. दिव्यांगानाही आरसे असलेल्या लिफ्टमधून प्रवास करताना अधिक सुरक्षित वाटते.

आरसे फायद्याचे कारण...

अनेकांना बंद जागेमध्ये गुदरल्यासारखं होणं, श्वास कोंडणं यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी आरसे फायद्याचे ठरतात. आरशांमुळे लिफ्टमधील जागा अधिक मोठी वाटते.

लिफ्ट अधिक मोठी वाटते

आरशांमुळे लिफ्टही अधिक मोठी वाटते. गुदमरल्यासारखं किंवा कोंडल्यासारखं आरसा असलेल्या लिफ्टमध्ये वाटतं नाही असं सांगितलं जातं. आपण अडकून पडू ही भावनाही आरसा असलेल्या लिफ्टमध्ये कमी असते.

पूर्वी आरसे नसायचे

पूर्वी लिफ्टमध्ये आरसे नसायचे. मात्र अशावेळी लिफ्टमध्ये शिरल्यावर काय करावं लोकांना कळायचं नाही. अनेकदा लोकांना लिफ्टची केबल पडण्याची भीती वाटायची. त्यामुळेच लिफ्टमध्ये आरसे बसवण्यात आले.

विरंगुळा मिळतो

लिफ्टमध्ये आरसे लावल्याने लोकांना एक विरंगुळा मिळतो. यामुळे लिफ्टमध्ये आरसे असतील तर आतील लोकांना अधिक सुरक्षित वाटतं.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story