हिलस्टेशन

फक्त 5000 हजारांच्या बजेटमध्ये 'या' हिलस्टेशनवर येऊन सुट्टीचा आनंद घ्या

कसोल

दिल्लीपासून 12 तासांच्या अंतरावर असणारं हिमाचलमधील हे ठिकाण. इथं तुम्ही 500 रुपयांपासून होम स्टेमध्ये जागा मिळवू शकता. दोन दिवसांसाठी इथं तुम्हाला 5000 रुपये पुरेसे

रानीखेत

उत्तराखंडमधील या ठिकाणी तुम्ही राहण्यासाठी 800 ते 1000 रुपये खर्च करून इथं तीन दिवस 5000 रुपयांमध्ये सहज व्यतीत करु शकता.

मॅक्लोडगंज

तिबेटन संस्कृतीची छटा दाखवणारं हे ठिकाण फारसं खर्चिक नाही. इथं राहण्साठी तुम्हाला साधारण 1200 रुपयांचा खर्च येतो.

अल्मोडा

दिल्लीपासून अवघ्या 370 किमीवर असणाऱ्या या ठिकाणी 5000 हजार रुपयांमध्ये तीन दिवस सहजपणे राहू शकता.

मसुरी

देहरादूनमधील या ठिकाणी येताच तुम्हाला निसर्गाचं नवं रुप पाहता येईल. इथं राहण्यासाठी 800 ते 1000 रुपयांना हॉस्टेल किंवा हॉटेल सहज मिळतं.

नारकांडा

हिमाचल प्रदेशातील नारकांडामध्ये पर्वतांच्या कुशीत राहण्याचा अनुभव काही औरच. इथं तुम्हाला होम स्टे, हॉस्टेल असे पर्याय वास्तव्यासाठी 1200 रुपयांपर्यंतचं शुल्क आकारतात.

मुक्तेश्वर

दिल्लीवरून बसनं पोहोचता येईल अशा अंतरावर असणारं मुक्तेश्वर तेथील डोंगररांगांमुळं लक्ष वेधतं. इथं राहण्याचा खर्च 800 ते 1200 रुपये माणसी इतका येतो.

VIEW ALL

Read Next Story