घरी आणलेल्या दुधातील भेसळ कशी ओळखायची?

दूध हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्वाचा पदार्थ आहे.

लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दुधाचे सेवन करतात.

आपण रोज सकाळी घरी दूध आणतो.

पण हे दूध असली आहे की भेसळयुक्त आहे, हे आपल्याला कसे कळेल?

भेसळयुक्त दूध प्यायल्याने आपल्या शरीराला खूप नुकसान होऊ शकते.

भेसळयुक्त दुध ओळखण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया.

घरी आणलेले दूध खराब असेल तर त्याला विशिष्ट प्रकारचा वास येईल. त्यामुळे दुधाचा वापर करताना वास घ्या.

दुधाचे काही थेंब प्लेटवर टाका आणि प्लेट तिरकी करा. दुधाची निशाणी मागे राहत असेल तर दूध असली आहे.

दुधातील भेसळ ओळखण्यासाठी लिटमस पेपर वापरु शकता.

लिटमस पेपर दुधात मिसळा. रंग बदलला तर समजून जा की दुधात भेसळ आहे.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story