कोळंबी फ्रेश आहे की नाही कसं ओळखायचं?

सी-फूड खाण्याची आवड असणारे खवय्ये फार आवडीने कोळंबी म्हणजे Prawns खात असतात. पण ते खायचे म्हटलं तर एकतर हॉटेल गाठावं लागतं किंवा मग घऱी तयार करावे लागतात.

काय आहे सोपी पद्धत

जर तुम्ही घरी कोळंबी खाण्याचा बेत आखत असाल तर तुम्ही विकत घेत असलेली कोळंबी ताजी आहे की नाही हे ओळखणं गरजेचं आहे. ते कसं ओळखायचं समजून घ्या...

हात लावताच समजेल

कोळंबीला हात लावताच तुम्हाला ती ताजी आहे की नाही समजेल.

पण ते कसं?

जर हात लावल्यावर कोळंबी चिकट किंवा लगद्यासारखी लागत असेल तर ती अजिबात खरेदी करु नका.

कोळंबीला हात लावून तपासा

व्यवस्थित समजून घेण्यासाठी कोळंबीला हलक्या हाताने दाबा. यावरुनच तुम्हाला अंदाज येईल.

ताजी कोळंबी पाहूनही कळेल

ताजी कोळंबी चमकदार आणि अर्धपारदर्शक असतात. तुम्ही पाहूनदेखील ते ताजे आहेत की नाही हा अंदाज लावू शकता.

वास घेऊन तपासा

ताज्या कोळंबीला नेहमीच थोडा खारट किंवा समुद्राचा वास येत असतो. तुम्ही ती खरेदी करण्याआधी वास घेऊनही पाहू शकता.

ताज्या कोळंबीचे डोळे नीट पाहा

ताज्या कोळंबीचे डोळे नेहमी चमकत असतात. पण जर ते आत गेलेले दिसत असतील तर खरेदी करु नका.

कोळंबीच्या मिशांचा रंग पाहा

कोळंबीच्या मिशा हलक्या गुलाबी किंवा लाल रंगाच्या असल्या पाहिजेत.

तपकिरी किंवा हिरवा रंग आहे का?

जर तुम्हाला ते तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे दिसत असतील तर खरेदी न करणंच जास्त शहाणपणाचं आहे.

VIEW ALL

Read Next Story