तिकीट आरक्षणाचे नियम

Indian Railway नं बदलले तिकीट आरक्षणाचे नियम, आताच पाहून घ्या

प्राधान्यानुसार आसन

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्यांचा आकडा देशात अतिशय मोठा आहे. अशा या प्रवासामध्ये प्रत्येकालाच प्राधान्यानुसार आसन निवडण्याचंही स्वातंत्र्य आहे.

जाणून आश्चर्य वाटेल...

जाणून आश्चर्य वाटेल, पण रेल्वेनं प्रवास करत असताना अंतर मोठं असेल तर बरेचजण Lower बर्थला पसंती देतात. अर्थात सर्वात खालचं आसन. आता या आसनाला पसंती देणाऱ्यांची पंचाईत होणार आहे. कारण, भारतीय रेल्वेनं तसा नियमच तयार केला आहे.

ठराविक प्रवाशांसाठी राखीव

इथून पुढं लोअर बर्थची आसनं ठराविक वर्गातील प्रवाशांसाठी राखीव असतील. दिव्यांग किंवा शारीरिक व्याधी असणाऱ्यांसाठी रेल्वेनं ही आसनं राखीव ठेवली आहेत.

4 आसनं थर्ड एसीमध्ये राखीव

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार 2 लोअर आणि 2 मिडल अशी 4 आसनं थर्ड एसीमध्ये राखीव असतील. तर, दोन आसनं स्लीपर कोचमध्ये राखीव असतील.

स्लीपर क्लासमध्येही ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिकांनाही रेल्वे प्रवासादरम्यान या आसनांवर बसवलं जाईल. स्लीपर क्लासमध्येही ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यासाठी लोअर बर्थची आसनं राखीव असतील.

TT शी संपर्क साधावा

सदर व्यक्तींकडून बुकिंगच्या वेळी जर अपर किंवा मिडल बर्थ बुक झाल्यास ऐन वेळी लोअर बर्थ हवं झाल्यास त्यांनी TT शी संपर्क साधावा असंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story