भारतात गंगा नदीला प्राचीन काळापासून विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानलं जातं.
गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत आणि बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे
गंगा नदी भारतातील 5 राज्यांमधून वाहते. गंगा नदीचा प्रवाह सुमारे 2525 किमी इतक आहे.
गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा
भारतात गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधून होतो, उत्तराखंडमध्ये गंगा नदीची लांबी 320 किमी आहे.
उत्तराखंडातून गंगा नदी उत्तर प्रदेशात येते. उत्तर प्रदेशात गंगा नदीची लांबी सुमारे 1,140 किमी आहे
उत्तर प्रदेशानंतर गंगा नदी बिहारमध्ये येते. बिहारमध्ये गंगा नदी सुमारे 445 किमी वाहते
बिहारनंतर, गंगा नदी झारखंडमध्ये वाहते, बिहारच्या शेजारील राज्य, झारखंडमध्ये गंगा नदी सुमारे 40 किमी वाहते.
झारखंडनंतर पश्चिम बंगालमध्ये गंगा नदी 520 किमी वाहते. पश्चिम बंगालनंतर गंगा नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते
भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटणा, प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक आणि आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.