पावसाळ्यात घरात पाल येते?

मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय

अनपेक्षित पाहुणे

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं, घाण पसरते. त्यामुळे किडे, पाल यांचा मुक्त संचार वाढतो.

भीतीदायक प्राणी

पावसाळ्यात घरांमध्ये सर्रास पाल येतात. अगदी त्यांचा पावसाळ्यात घरात वावर वाढतो. त्यामुळे अनेकांना पालाची भीती वाटते.

सोप्या टिप्स

तुमच्या घरातही पाल शिरली आहे. मग आज आम्ही तुम्हाला या अनेपक्षित पाहुण्याला घरातून बाहेर काढण्यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहोत.

घर स्वच्छ ठेवा

मुळात पावसाळ्यात रोगराई आणि पाल किटांणूपासून संरक्षणासाठी घर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. खास करुन किचनमधील सिंक ड्रॉर्स कोरडे आणि स्वच्छ ठेवा.

कॉफीचा उपयोग

कॉफीचा वास पाल यांना आवडतं नाही. त्यामुळे अशावेळी कॉफीमध्ये थोडी तंबाखू पावडर आणि पाणी टाकून या मिश्रणाचे गोळे बनवा. आता हे गोळे पालची वावर घरात ज्या ठिकाणी आहे तिथे ठेवा.

मिरपूड स्प्रे

मिरपूडचं स्प्रे हे पालीवर शिंपडल्यास ती घराबाहेर पळून जाते. काळी मिरी पावडर आणि पाण्याचा स्प्रे तयार करा. हा उपाय तुम्ही लाल मिरची पावडरसोबतही करु शकता.

अंड्याचे कवच

अंड्याच्या कवचापासून पाल दूर पळतात. पालींना अंड्याचा उग्र वास आवडतं नाही.

लसून कांद्याचा रस

लसून कांद्याचा रसाचे स्प्रे पालीवर शिंपडल्यास ती घराबाहेर पळून जाते.

VIEW ALL

Read Next Story