लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना कोणत्या गोष्टी हव्या असतात...

लग्न म्हणजे दोन जीवांचे, शरीराचे मिलन. लग्नानंतर जेव्हा पती पत्नी एकत्र राहायला सुरुवात करतात, तेव्हा हळू हळू एकमेकांची सवय होत जाते.

एकमेकांना समजून घ्या...

ठरवून केलेल्या लग्नात दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो, अशावेळी तुम्हाला पार्टनरसोबतचा सेक्स किती हवाहाव्सा वाटतो त्यावर नात्यातील रस अवलंबून असतो.

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री...

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री तुम्ही पार्टनरला जितके आपलेसे करता तितके तुमच्या नाते घट्ट होत जाते.

पहिल्या रात्री स्त्रीला नक्की काय हवे...

म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रीला नक्की काय हवे असते याबाबत जाणून घ्या...

गिफ्ट द्या

तुमच्या जोडीदाराशी संवाद करण्यापूर्वी तिला एखादे गिफ्ट द्या. यामध्ये तुम्ही सुगंधी फुले, गजरा, ड्रेस किंवा साडी देऊ शकता.

संवाद

लग्न ठरवून केले तर सुरुवातीला दोघांनाही एकमेकांना समजून घेणे फारच गरजेचे असते. याकरता दोघांमध्ये संवाद होणे गरजेचे असते. कारण पती-पत्नीला सर्वच गोष्टी नव्या असतात.

भावनिक जवळीक करा

मुलगी आपल्या माणसांना सोडून केवळ तुमच्यासाठी तुमचे घर आपले करते. तुमच्या माणसांना आपलेसे करते. त्यामुळे तिला तुम्ही एकटे वाटू देऊ नका. तिला आपलेसे करा. तिची काळजी घ्या. सतत तिला काय हवे, नको याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

सौम्य फोरप्ले

तुमचा पार्टनर तयार आहे का याचा अंदाज घ्या आणि त्यानंतर पुढे जा. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री पुरुषाला सेक्स करण्याची इच्छा असते. मात्र, त्याआधी तुम्ही तुमच्या जोडीदाराची परवानगी घ्या. याकरता आधी तिला प्रेमाने जवळ घेऊन तिला अलगद स्पर्श करा.

मैत्री

नात्यात पती पत्नीच्या अधिकाराऐवजी दोन मित्रांमधील प्रेम हवे. नव्या घरी आपल्या नवऱ्याच्या रूपाने आपल्याला मित्र मिळेल ही मुलींची अपेक्षा असते, त्यामुळे तुम्हीही त्यांना एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वागणूक द्या.

कौतुक

नव्या घरी, नव्या घरातील लोक आपल्याला स्वीकारतील का? ही भीती प्रत्येक मुलीच्या मनात असते. त्यामुळे पहिल्या रात्री तुम्ही तुमच्या पार्टनरचे कौतुक करा, ती किती सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवून द्या. यामुळे मुलीच्या मनात आत्मविश्वास निर्माण होऊन तीसुद्धा तुम्हाला आपलेसे करेल.

VIEW ALL

Read Next Story